• 25 जनवरी 2021 को औरंगाबाद में प्रणाम पर्यटन के औरंगाबाद विशेषांक का विमोचन करते हुए डॉ श्रीमंत हारकर (उप निदेशक महाराष्ट्र पर्यटन निदेशालय ,औरंगाबाद) , गणेश रामदासी (विभागीय संचालक ,माहिती व जनसम्पर्क महासंचनालय ,औरंगाबाद , प्रदीप श्रीवास्तव (संपादक),विजय जाधव,सहायक निदेशक महाराष्ट्र पर्यटन ,औरंगाबाद ,सुश्री सुरेखा शाह ,संचालिका होटल कैलाश (एलोरा),विजय चौधरी ब्यूरो प्रमुख, मराठवाडा ,एड कैसरोद्दीन रमज़ानी (पूर्व नगराध्यक्ष, खुलताबाद) आदि । 
-------------------------------------------------------------------------------------------------

लवकरच औरंगाबाद होणार टुरिझम हब : डॉ.श्रीमंत हारकर

विजय चौधरी / औरंगाबाद /मराठवाडा

मराठवाड्यातील गडकिल्ल्यांचा विकास, लाईट अँड साऊंड शो, संगीत कारंजे, रोप पे, साहसी पर्यटनाला चालना मिळत असून महाराष्ट्र राज्याबाहेरील तसेच देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करून पर्यटकांना आवश्यक व पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची योजना आहे. लवकरच औरंगाबाद टुरिझम हब होणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास संचालनालय प्रादेशिक कार्यालय औरंगाबादचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर यांनी दिली. ते खुलताबाद येथे 'करोना नंतरचे पर्यटन विश्व' या विषयावर  आयोजित परिसंवादात बोलत होते.

पत्रकार विजय चौधरी यांच्या पुढाकाराने खुलताबाद तालुका पर्यटन विविध व्यावसायिक सेवा सहकारी संस्था व प्रथम अरोरा शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पेस सेंटर नंद्राबाद येथे हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी  उत्तरप्रदेश लखनौ येथून प्रकाशित होणाऱ्या प्रणाम पर्यटन औरंगाबाद विशेषांकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.

अडवेंचर पार्क, हॉटेल्स-रिसॉर्टपॅराग्लायडिंग, बोटॅनिकल गार्डन इत्यादी अशा पर्यटन आणि मनोरंजन सुविधांचा अंतर्भाव पर्यटन आराखड्यात आहे. या निर्णयामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. आता एमटीडीसीच्या माध्यमातून वेरुळ, अजिंठा येथे पायाभूत विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. मराठवाड्यात ठिकठिकाणी पर्यटन महोत्सव साजरा केला जाणार आहे. शिवाय या भागातील पर्यटन वाढल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास संचालनालय प्रादेशिक कार्यालय औरंगाबादचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर यांनी बोलताना सांगितले.

या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय औरंगाबादचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर होते. तर लखनौ येथून प्रकाशित होणाऱ्या हिंदी त्रे मासिक प्रणाम पर्यटनचे संपादक प्रदीप श्रीवास्तव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे औरंगाबाद विभागाचे संचालक गणेश रामदासी, महाराष्ट्र पर्यटन विकास संचालनाय सहाय्यक संचालक विजय जाधव, पेस सेंटरचे बी.दामोदरउद्योजक सुरेखा शाह, गोपालकृष्ण घरकीपाटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

करोनाच्या महामारीमध्ये जगात लॉकडाऊन असताना पर्यटन उद्योग संकटात सापडला.  पर्यटन क्षेत्रही त्याला अपवाद नव्हते. आता हळूहळू पर्यटन चक्र पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र या संकटातून संधी समजून त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांमधून धडे घेऊन आपण सकारात्मक विचार करून भविष्यातील करोना नंतरच्या पर्यटनासाठी सज्ज असायला हवे, हा या संकटाचा सांगावा आहे. असा सूर करोनानंतरचे पर्यटन विश्व या विषयावरील परिसंवादात उमटला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार विजय चौधरी यांनी केले, ते म्हणाले, करोनामुळे कोलमडलेल्या पर्यटनाला पुन्हा एकदा समृद्ध करावे लागेल.  पर्यटकांच्या गरजा भागविण्यासाठी तसेच प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळांबरोबरच प्रसिद्धीपासून वंचीत असलेल्या पर्यटनस्थळांची माहिती नसलेले नवीन पर्यटन स्थळे यांची माहिती पर्यटकांना करून देऊन  त्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे औरंगाबाद विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी सांगितले की, सरकार पर्यटन विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यावर काम करत आहे. लोकल ते ग्लोबल टुरिझम विकास करतांना ग्रामीण पर्यटनाला चालना दिली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी स्वस्त आणि मस्त निवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. मध्यमवर्गीय कुटूंबाला परवडेल अशा दरात राहण्याची सोय झाली तर बाहेरगावच्या पर्यटकांना दोन तीन दिवस राहता येईल. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणारी पुस्तिका असावी, त्यासाठी एक समिती नेमण्यात यावी अशी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन व्यावसायिक पुंडलिक वाघ यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची क्षमता पर्यटन व्यवसायात असून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक पर्यटन क्षेत्र याला मोठी संधी आहे. त्यासाठी शहरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोयीसुविधांची गरज असल्याचे  त्यांनी सांगितले. प्रणाम पर्यटनचे संपादक प्रदीप श्रीवास्तव यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांकडे महाराष्ट्राबाहेरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रणाम पर्यटनने औरंगाबाद विशेषांक प्रकाशित केला आहे. हा विशेषांक पर्यटकांसाठी कायम संग्रही राहील  असा अमूल्य ठेवा आहे. माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन यांनी सुफी संतांची भूमी तसेच एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या धार्मिक पर्यटनासाठी विकास योजना राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी शिल्पकार नरेंदसिंग साळुंके व स्वाती साळुंके या दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन श्रीहरी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय चौधरी यांनी केले. पर्यटनाच्या क्षितिजावर औरंगाबादची मुद्रा उमटविण्याचा निर्धार यावेळी उपस्थित पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश कायस्थ, गणेश सावजी, तेजस सावजी, केदार सावजी, संजय चौधरी, मनोज शिंपी, सुजित जोशी, अजय चौधरी, वेद चौधरी यांनी परिश्रम घेतले.